पोस्ट्स

मे, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एक तारी सूर जाणे….

संगीत… आपल्या लाडक्या कृष्णाजवळ पोहोचण्याचं एक प्रभावी माध्यम! ही माहिती म्हणून फक्त डोक्यात असणं आणि याचा प्रत्यक्ष अनुभव येणं यामध्ये खूप फरक असतो. हे काल जाणवलं. सहज म्हणून एक साधंसं गीत गायचा प्रयत्न करत असताना कृष्णाला अनुभवून मनाच्या झालेल्या भावविभोर स्थितीची या मोहनकामिनीची छोटीशी अनुभूती. आपण सर्वचजण असे काही प्रसंग नक्कीच अनुभवतो जेव्हा मनामध्ये खोलवर झालेल्या जखमा व्यक्त करायला शब्द सापडत नसतात. आपल्याला नेमकं काय हवंय हे ही आपल्याला कळत नसतं आणि त्यामुळे नेमकं आपल्याला काय झालंय या प्रश्नाचं उत्तरही देणं शक्य नसतं. असंच एक छोटंसं वादळ माझ्या जीवनात येऊन गेलं. त्यातून मनाला एवढा धक्का बसला होता की काही बोलायला गेलं की डोळ्यातून अश्रुंच्या धारांव्यतिरिक्त काही येत नव्हतं. एक वेळ अशी स्थिती झाली होती की डोळ्यातून पाणी येणं ही बंद झालं होतं. मनात एक विचित्र शांतता पसरली होती.  आता एक आणखी गोष्ट इथे सांगावीशी वाटतेय, जेणेकरून हे अनुभूती म्हणून का लिहावंसं वाटतंय याचा अंदाज येईल. एक काळ होता जेव्हा मी खूप मन लावून संगीताचे धडे घेतले. पण नंतर घशाला काहीतरी इन्फेक्शन झालं ज्यान...