अधीरता
का रे असा बरसतोस हूरहूर मनी लावतोस तव धारांसह असा हा व्याकुळ पवन धाडतोस…. का धरणीस भेटावसा अधीर एवढा होतोस साधून संध्या समय नेमका चिंब तिला भिजवितोस! साद तप्त धरणीची जशी तुजला रुचते का रे माझी भक्ती मोहनास न भावते - मोहनकामिनी
कृष्णभक्तीच्या अखंडीत प्रवाहाचा चिरंतर अनुभव..