पोस्ट्स

सप्टेंबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वेड्या मना तळमळसी!

आपण म्हणतो न, 'कळतंय पण वळत नाहीये'. वळत नसण्याचं मुख्य कारण आपलं मनच तर असतं. आपल्याला सर्वांनाच अनुभव येतो की, 'मला हे नकारात्मक विचार नकोत पण ते थांबवताच येत नाहीयेत.' किंवा कोणी दुःखात असताना आपली समजूत काढायला येतं तेव्हाही आपण म्हणतो की, हे सगळं मला कळतंय पण जमत नाहीये. हे फक्त आपल्यालाच नाही बरंका, तर पराक्रमी महाबाहु अर्जुनाला सुद्धा हा प्रश्न पडलाच होता. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम्। तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्॥ म्हणजेच, 'कृष्णा! मन केवढे चंचल, प्रमथनशील, हट्टी आणि बलवान आहे! याचा निग्रह करणं अगदीच अवघड आहे रे!' त्यावर कृष्ण म्हणाला, असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम्। अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते॥ म्हणजेच, 'हे महाबाहु अर्जुना, मन हे निग्रह करायला अवघड आणि चंचलच आहे. केवळ अभ्यास आणि वैराग्य यानेच याचा निग्रह करणं शक्य आहे.' मनाचा निग्रह करणं, नकारात्मक विचार कमी होऊन त्यात सकारात्मक विचारांची पेरणी होणं आणि एका शाश्वत स्थैर्याकडे मनाची वाटचाल सुरू होणं, हा एक दीर्घ प्रवासच आहे हे श्...