पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चाहुल

असेल कोण मोहन माझा, मन जाणते न माझे, परि पाहते अंतरी निशीदिनी मी अजाण रुप त्याचे... डोळे मिटता समोर येते, राजस रुप मम कृष्णाचे, वर्ण तयाचा अदृश्य परि रुप साजिरे मज भासे.. रंग रुपा पल्याड आमुचे निराकार निर्गुण नाते, परि पहावया सगुण रुप ते, अवचित मन हे बावरते... ~ मोहनकामिनी

अधीरता

का रे असा बरसतोस हूरहूर मनी लावतोस तव धारांसह असा हा व्याकुळ पवन धाडतोस…. का धरणीस भेटावसा अधीर एवढा होतोस साधून संध्या समय नेमका चिंब तिला भिजवितोस! साद तप्त धरणीची  जशी तुजला रुचते का रे माझी भक्ती मोहनास न भावते - मोहनकामिनी

मधुरा भक्ती

कान्हा, माझी वाट खडतर सोबतीस ये तू, रे गिरीधर हात द्यावया येती कुणी मज परि मनी माझिया तुझेच चिंतन भोवती माझ्या अनेक जन कुणी देखणे, कुणी लोभस परि गवसत नाही तयात प्रियकर, सांग कुणास येईल तुझी सर तव विरहात मी झाले हतबल साद घालते विरहीणी व्याकुळ दे मज आता तुझेच दर्शन तुज सवे मजला ने रे मोहन - मोहनकामिनी

विरह

तुज पुकारित थकले रे कान्हा नयन हे अतृप्त मोहना तुज ठाऊक का ही कामना अव्यक्त? - मोहनकामिनी