मधुरा भक्ती



कान्हा, माझी वाट खडतर
सोबतीस ये तू, रे गिरीधर
हात द्यावया येती कुणी मज
परि मनी माझिया तुझेच चिंतन

भोवती माझ्या अनेक जन
कुणी देखणे, कुणी लोभस
परि गवसत नाही तयात प्रियकर,
सांग कुणास येईल तुझी सर

तव विरहात मी झाले हतबल
साद घालते विरहीणी व्याकुळ
दे मज आता तुझेच दर्शन
तुज सवे मजला ने रे मोहन

- मोहनकामिनी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शरणागत