व्यक्त व्हावं! व्यक्त हो - स्त्री असो वा पुरुष, व्यक्त नक्कीच हो! नको देऊस स्वतःला सगळं मनात ठेवण्याचा ताण… बाहेरचे पसारे सावरण्यात किती करशील स्वतःच्या मनाला हैराण? खरंय… नेहमी नेहमी नसतं कुणी आपलंच ऐकायला ‘ऍवेलेबल’, परिस्थिती पुढे असतोच आपण सारे जण हतबल! काही हरकत नाही! काही हरकत नाही, तू बोल स्वतःशी … दुसरं कोणी असो वा नसो, तो वरचा असतोच नेहमी पाठीशी!! व्यक्त होणं काही फक्त भावनांनाच लागू नसतं, भोवतालाच्या वेगवेगळ्या विषयांवर बोलायला आपल्याला कुणीतरी हवंच असतं कधी संकोच बाळगून, तर कधी प्रतिक्रियांचा विचार करून स्वतःला गप्प करणं सुरू असतं, पण कशाला? कुठल्याही, अगदी कुठल्याही विषयावरचं मत मांडायचं स्वातंत्र्य प्रत्येकालाच असतं हो, मात्र ऐकणार्याला ही स्वातंत्र्य असतं! ऐकणार्याला ही स्वातंत्र्य असतं आपलं ऐकायचं की नाही ठरवायचं… पण एकाने ऐकून नाही घेतलं म्हणून सगळीकडेच अबोला धरणं चूकीचं असतं…. सोशल मिडिया आहे की! उचल फोन, कर रेकॉर्ड, भरभरून बोल, मोकळं हो! मात्र ‘लाईक्स, डिसलाईक्स’ दोन्हीला ही स्विकारायला ही सिद्ध हो!! पण काही गोष्टी लक्षात ठेव! ताण नको घेऊ, पण ...
अक्षय्य तृतीया! या सणाचं नाव उच्चारलं तरी खूप पवित्र वाटतं. आज चैत्र गौरीचं उद्यापन होणार असल्याने महिनाभर पूजलेल्या या देवी मातेचं तत्त्व आणि जोडीला भगवान विष्णूचं ही तत्त्व या दिवशी पृथ्वीवर कार्यरत असतं. किती सुंदर आणि विलक्षण योग असतो न हा. या चैतन्याचा प्रभावच असा असतो की इतर वेळी फारसे धार्मिककार्यां मध्ये रस न घेणारे लोकही या काही विशिष्ट सणांना अंतःप्रेरणेने आवर्जुन काही न काही विधी करतात. आज खरंतर सुट्टी नाही. रोजचे सगळे व्याप आहेतच, पण सकाळी लवकर उठून, स्नान करून देवाला भरपूर फूलांनी सजवून पूजा केल्याने एक खूप वेगळीच शांतता जाणवतेय. आपसुकच ओठांवर ऊं नमो भगवते वासुदेवाय चा जप होतोय. खूप छान वाटतंय! ही अक्षय्य तृतीया माझी लग्नानंतरची तशी दुसरी अक्षय्य तृतीया. पण या सणाशी माझ्या माहेराशी जोडलेल्या खूप सुंदर आणि मनाला प्रसन्न करणार्या आठवणी आहेत, त्या काही मागे सुटलेल्या नाहीत. माझी आई चैत्रगौरीचं व्रत खूप मनोभावे करते. आता तरी रिटायर झाली. पण काम सुरु असताना ही हे व्रत तिने कधी चुकवलं नाही. दरवर्षी ती न चुकता व्रत सुरु होण्यापूर्वी छान चिंच आणि रीठाने गौर स्वच्छ उजळून, धुवून पु...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा