अधीरता


का रे असा बरसतोस
हूरहूर मनी लावतोस
तव धारांसह असा हा
व्याकुळ पवन धाडतोस….

का धरणीस भेटावसा
अधीर एवढा होतोस
साधून संध्या समय नेमका
चिंब तिला भिजवितोस!

साद तप्त धरणीची 
जशी तुजला रुचते
का रे माझी भक्ती
मोहनास न भावते
- मोहनकामिनी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राधेमधली मीरा!

चाहुल