कळली देवा तुला राधिका रे राधिका… साधी भोळी मीरा तुला कळली नाही, तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही!! कृष्णावरचा केवढा प्रेमळ आरोप आहे हा! मीरा कृष्णाला गोड प्रश्न विचारतेय की त्या राधेला एवढं प्रेम देतोस तेवढं मला का म्हणून देत नाहीस?! वास्तविक मीरे ला माहितीच होतं की कृष्णाचा तिच्यावर तेवढाच जीव आहे जेवढा 'राधे' वर. (आता राधा या पात्रा बद्दलचा विवाद आपण नंतर कधीतरी बघू.) मीरे साठी साक्षात कृष्णाने स्वतः विष प्राशन केलं की! लोकांचं आयुष्य जातं कृष्णाला प्रसन्न करून घेण्यात पण मीरेच्या भजनांवर मात्र कृष्ण स्वतः डोलू लागला. खरंच दगडामध्ये देव असतो का याचं उत्तर या प्रसंगां मधून मिळतं. देवत्व खरतर सगळीकडेच असतं, फक्त आपल्याला अनुभवता आलं पाहिजे! एकीकडे मीरा ही कृष्णाची प्रिय भक्त आहे असं म्हटलं तर दुसरीकडे राधा! ती जणू पट्टराणीच कृष्णाची. दोघींचा ही उद्धार कृष्णाने केलाच. दोघींच्या भक्ती मध्ये काही श्रेष्ठ कनिष्ठ भाव म्हटला तर तो ही नाही. या दोघी एका स्त्रिच्या दोन बाजू असू शकतात का? राधा, संसारात रमणारी… मीरा सगळ्याच्या परे, विरक्त स्थितीमध्ये असणारी. आपल्यामध्ये ही या दोन्ही गोष्...
असेल कोण मोहन माझा, मन जाणते न माझे, परि पाहते अंतरी निशीदिनी मी अजाण रुप त्याचे... डोळे मिटता समोर येते, राजस रुप मम कृष्णाचे, वर्ण तयाचा अदृश्य परि रुप साजिरे मज भासे.. रंग रुपा पल्याड आमुचे निराकार निर्गुण नाते, परि पहावया सगुण रुप ते, अवचित मन हे बावरते... ~ मोहनकामिनी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा