शरणागत

 अगाध लीला तुझी मोहना

आम्हा कधी उमजेल का?

दृष्टी पल्याड सृष्टी सारी

दिशा तूच दावशील ना?


संकट उंबर्‍यापाशी येता

तूच सदैव निवारण केले

मजला ते दृष्टीस पडण्या

आधीच दृष्टी आड केले….


मीरे इतकी नसेल माझी

अविरत प्रीत तव चरणी

परी तुझ्याच ठायी असेल सदैव

शरणागत जन्मो जन्मी


एकच आशा मनात आता

तव ध्यास घेऊनी तेवते

विसर तुझा रे पडो न कधी मज

दुजे न काही मागते, दुजे न काही मागते….

- मोहनकामिनी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मधुरा भक्ती