पोस्ट्स

अभिव्यक्ती

  व्यक्त व्हावं! व्यक्त हो - स्त्री असो वा पुरुष, व्यक्त नक्कीच हो!  नको देऊस स्वतःला सगळं मनात ठेवण्याचा ताण… बाहेरचे पसारे सावरण्यात किती करशील स्वतःच्या मनाला हैराण? खरंय… नेहमी नेहमी नसतं कुणी आपलंच ऐकायला ‘ऍवेलेबल’, परिस्थिती पुढे असतोच आपण सारे जण हतबल!  काही हरकत नाही! काही हरकत नाही, तू बोल स्वतःशी … दुसरं कोणी असो वा नसो, तो वरचा असतोच नेहमी पाठीशी!! व्यक्त होणं काही फक्त भावनांनाच लागू नसतं, भोवतालाच्या वेगवेगळ्या विषयांवर बोलायला आपल्याला कुणीतरी हवंच असतं कधी संकोच बाळगून, तर कधी प्रतिक्रियांचा विचार करून स्वतःला गप्प करणं सुरू असतं, पण कशाला?  कुठल्याही, अगदी कुठल्याही विषयावरचं मत मांडायचं स्वातंत्र्य प्रत्येकालाच असतं हो, मात्र ऐकणार्‍याला ही स्वातंत्र्य असतं! ऐकणार्‍याला ही स्वातंत्र्य असतं आपलं ऐकायचं की नाही ठरवायचं… पण एकाने ऐकून नाही घेतलं म्हणून सगळीकडेच अबोला धरणं चूकीचं असतं…. सोशल मिडिया आहे की! उचल फोन, कर रेकॉर्ड, भरभरून बोल, मोकळं हो! मात्र ‘लाईक्स, डिसलाईक्स’ दोन्हीला ही स्विकारायला ही सिद्ध हो!! पण काही गोष्टी लक्षात ठेव! ताण नको घेऊ, पण ...

एक तारी सूर जाणे….

संगीत… आपल्या लाडक्या कृष्णाजवळ पोहोचण्याचं एक प्रभावी माध्यम! ही माहिती म्हणून फक्त डोक्यात असणं आणि याचा प्रत्यक्ष अनुभव येणं यामध्ये खूप फरक असतो. हे काल जाणवलं. सहज म्हणून एक साधंसं गीत गायचा प्रयत्न करत असताना कृष्णाला अनुभवून मनाच्या झालेल्या भावविभोर स्थितीची या मोहनकामिनीची छोटीशी अनुभूती. आपण सर्वचजण असे काही प्रसंग नक्कीच अनुभवतो जेव्हा मनामध्ये खोलवर झालेल्या जखमा व्यक्त करायला शब्द सापडत नसतात. आपल्याला नेमकं काय हवंय हे ही आपल्याला कळत नसतं आणि त्यामुळे नेमकं आपल्याला काय झालंय या प्रश्नाचं उत्तरही देणं शक्य नसतं. असंच एक छोटंसं वादळ माझ्या जीवनात येऊन गेलं. त्यातून मनाला एवढा धक्का बसला होता की काही बोलायला गेलं की डोळ्यातून अश्रुंच्या धारांव्यतिरिक्त काही येत नव्हतं. एक वेळ अशी स्थिती झाली होती की डोळ्यातून पाणी येणं ही बंद झालं होतं. मनात एक विचित्र शांतता पसरली होती.  आता एक आणखी गोष्ट इथे सांगावीशी वाटतेय, जेणेकरून हे अनुभूती म्हणून का लिहावंसं वाटतंय याचा अंदाज येईल. एक काळ होता जेव्हा मी खूप मन लावून संगीताचे धडे घेतले. पण नंतर घशाला काहीतरी इन्फेक्शन झालं ज्यान...

माझ्या आठवणीतली चैत्रगौर

अक्षय्य तृतीया! या सणाचं नाव उच्चारलं तरी खूप पवित्र वाटतं. आज चैत्र गौरीचं उद्यापन होणार असल्याने महिनाभर पूजलेल्या या देवी मातेचं तत्त्व आणि जोडीला भगवान विष्णूचं ही तत्त्व या दिवशी पृथ्वीवर कार्यरत असतं. किती सुंदर आणि विलक्षण योग असतो न हा. या चैतन्याचा प्रभावच असा असतो की इतर वेळी फारसे धार्मिककार्यां मध्ये रस न घेणारे लोकही या काही विशिष्ट सणांना अंतःप्रेरणेने आवर्जुन काही न काही विधी करतात. आज खरंतर सुट्टी नाही. रोजचे सगळे व्याप आहेतच, पण सकाळी लवकर उठून, स्नान करून देवाला भरपूर फूलांनी सजवून पूजा केल्याने एक खूप वेगळीच शांतता जाणवतेय. आपसुकच ओठांवर ऊं नमो भगवते वासुदेवाय चा जप होतोय. खूप छान वाटतंय! ही अक्षय्य तृतीया माझी लग्नानंतरची तशी दुसरी अक्षय्य तृतीया. पण या सणाशी माझ्या माहेराशी जोडलेल्या खूप सुंदर आणि मनाला प्रसन्न करणार्‍या आठवणी आहेत, त्या काही मागे सुटलेल्या नाहीत. माझी आई चैत्रगौरीचं व्रत खूप मनोभावे करते. आता तरी रिटायर झाली. पण काम सुरु असताना ही हे व्रत तिने कधी चुकवलं नाही. दरवर्षी ती न चुकता व्रत सुरु होण्यापूर्वी छान चिंच आणि रीठाने गौर स्वच्छ उजळून, धुवून पु...

राधेमधली मीरा!

कळली देवा तुला राधिका रे राधिका… साधी भोळी मीरा तुला कळली नाही, तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही!! कृष्णावरचा केवढा प्रेमळ आरोप आहे हा! मीरा कृष्णाला गोड प्रश्न विचारतेय की त्या राधेला एवढं प्रेम देतोस तेवढं मला का म्हणून देत नाहीस?! वास्तविक मीरे ला माहितीच होतं की कृष्णाचा तिच्यावर तेवढाच जीव आहे जेवढा 'राधे' वर. (आता राधा या पात्रा बद्दलचा विवाद आपण नंतर कधीतरी बघू.) मीरे साठी साक्षात कृष्णाने स्वतः विष प्राशन केलं की!  लोकांचं आयुष्य जातं कृष्णाला प्रसन्न करून घेण्यात पण मीरेच्या भजनांवर मात्र कृष्ण स्वतः डोलू लागला. खरंच दगडामध्ये देव असतो का याचं उत्तर या प्रसंगां मधून मिळतं.  देवत्व खरतर सगळीकडेच असतं, फक्त आपल्याला अनुभवता आलं पाहिजे! एकीकडे मीरा ही कृष्णाची प्रिय भक्त आहे असं म्हटलं तर दुसरीकडे राधा! ती जणू पट्टराणीच कृष्णाची. दोघींचा ही उद्धार कृष्णाने केलाच. दोघींच्या भक्ती मध्ये काही श्रेष्ठ कनिष्ठ भाव म्हटला तर तो ही नाही. या दोघी एका स्त्रिच्या दोन बाजू असू शकतात का? राधा, संसारात रमणारी… मीरा सगळ्याच्या परे, विरक्त स्थितीमध्ये असणारी. आपल्यामध्ये ही या दोन्ही गोष्...

जेजुरीची आठवण

जेजुरी हे नाव वाचून खरंतर कोणाला आश्चर्य वाटेल की 'मोहनकामिनी' या व्यासपीठावर खंडोबाची जेजुरी कशी काय? पण शेवटी तत्त्व तर एकच असतं. जसा कृष्ण हा मोहन असू शकतो, तसाच खर्‍या भक्तासाठी खंडोबा हा पण मोहनच असतो.  तर खंडोबा आपलं महाराष्ट्रामधल्यांचं आवडतं दैवत. कोणताही शुभप्रसंग असो, सगळं पार पडण्यापूर्वी आणि सगळं पार पडल्यावर आपण खंडोबाला जावून नक्कीच येणार. ज्याला स्वतःचं कुलदैवत माहिती नाही त्याने कुठे जाव तर खंडोबालाच! असा हा आपला पराक्रमी आणि तेवढाच दयाळू खंडोबा! तर हा पहिल्यांदा जेजुरीला जावून आल्यावरचा हा माझा छोटासा पहिलाच अनुभव सांगायचा प्रयत्न करते. आमच्याकडे माहेरी चम्पाषष्ठीचा कुळधर्म असतो. खरेतर खंडोबा आमचं कुलदैवत नाही पण हा कुळधर्म मात्र आमच्याकडे नेहमीच असतो. त्यामुळे मल्हारी मार्तंडाची आरती ही आमच्या नेहमीच्या म्हणण्यातलीच. सुरुवातीला ती आरती आपली म्हणायची म्हणून म्हटली जायची पण जशी मोठी होत गेले तसं ते आरतीमधले शब्द मनावर रुजायला लागले. आपण खरंच काय म्हणतोय, आरतीमध्ये खंडोबाचं काय वर्णन केलंय याची जाणीव व्हायला लागली आणि ते सगळं ऐकून, समजून घेऊन मन भारावून गेलं. तरी...

शरणागत

 अगाध लीला तुझी मोहना आम्हा कधी उमजेल का? दृष्टी पल्याड सृष्टी सारी दिशा तूच दावशील ना? संकट उंबर्‍यापाशी येता तूच सदैव निवारण केले मजला ते दृष्टीस पडण्या आधीच दृष्टी आड केले…. मीरे इतकी नसेल माझी अविरत प्रीत तव चरणी परी तुझ्याच ठायी असेल सदैव शरणागत जन्मो जन्मी एकच आशा मनात आता तव ध्यास घेऊनी तेवते विसर तुझा रे पडो न कधी मज दुजे न काही मागते, दुजे न काही मागते…. - मोहनकामिनी

कृष्णमय

 तुझेच चिंतन घडो निरंतर सदैव माझे मनी, ये रे कान्हा घेऊनी जा मज तुजसवे वृंदावनी!! - मोहनकामिनी